PRAVASI

बुधवार, 31 मार्च 2010

 
प्रत्येक वेळी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा 
नेहमीच लक्षात असुद्या कि तुमचे प्रिय आप्तजन घरी तुमची वाट बघत  असतात. रेल्वे क्रासिंगवर सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून आपला अनमोल जीव धोक्यात घालू नका . 


* रेल्वे लाईन  ओलांडण्या करिता अधिकृत समपार फाटकांचाच  उपयोग करा, आपला अमूल्य जीव  धोक्यात घालू नका, आपल्या जीवाची आणि आर्थिक हानी होऊ शकते.
* ज्या समपार फाटकावर रेल्वे कार्मचारी कार्यरत नाहीत तेथे प्रथम थांबा दोन्ही बाजूंचे निट निरक्षण करा रेल्वे गाडी येत नसल्याची खात्री करा व त्या नंतर समपार फाटक ओलंडा.
* वरील नियमांचे काटेकोर पालन न केल्यास  मोटार वाहन अधिनियम १३१ व भारतीय रेल्वे अधिनियम १९८९ उपनियम १६१ च्यानियमा अनुसार दंडनीय अपराध आहे ज्या करीता आपणास एक  वर्षा करिता कारवासाची  शिक्षा होउ  शकते  







सुरक्षित व सुखकरप्रवासा करिता आवश्यक सूचना 
 
* रेल्वे स्टेशन वर लवकर येणे करागाडी पकडण्यासाठी धावपळ करू नका.
                                 
* ज्वलनशील पदार्थ सोबत घेऊन किंवा जवळ बाळगून प्रवास करू नका.          
* गाडीत मद्यपान करू नका किंवा नशा केलेल्यास्थितीत गाडीत प्रवास करू नका.       
                          
       





* डब्यांत सिगारेट किंवा बिडी ओढू नका.डब्यांतील सह प्रवाशांना त्रास होऊ शकतो.





* डब्यांत जळती आगकाडी किंवा सिगारेट फेकू नका.

* पायरीवर बसून, डब्याच्या दाराजवळ उभे राहून किंवा बसून प्रवास करू नका.
                       
                                       

* गाडीत चढतांना आणि उतरतांना पायरीकडे नीट लक्ष असुद्या.
* पाठीला टेकण्यासाठी असलेली शायिका रात्री ९:०० ते सकाळी ६:०० वाजे पर्यंत वर उचलून ठेवा.जेणे करून तीन पैकी मधल्या शायीकाचा उपयोग संबधित प्रवासी सहजतेने करूशकेल. तसेच त्या शायिकाचा उपयोग सकाळी ६:०० ते रात्री ९:०० पर्यंत पाठीला टेकण्यासाठी करा जेणे करून सह प्रवाश्यांना नीटबसण्याकरिता त्याचा उपयोग करता येईल.
           
     
* तुमच्या सामानाची काळजी तुम्हाला स्वतःला घ्यावयाची आहे,सामान हरवल्यास अथवा गहाळ झाल्यास त्वरित रेल्वे अधिकारी किंवा कर्मचारी ला कळवा.
    

* खालच्या शायिकेच्या खाली साखळी लावलेली असते तिचा उपयोग करा व आपले सामान सुरक्षित ठेवा.


टिप्पणियाँ: एक टिप्पणी भेजें

सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]





<< मुख्यपृष्ठ

मेमोरी

मार्च 2010   अप्रैल 2010   सितंबर 2010  

This page is powered by Blogger. Isn't yours?

सदस्यता लें संदेश [Atom]