5.आरक्षित तिकिटावर तुम्ही ज्या वर्गाचे टिकिट खरेदी केले आहे त्या प्रमाणे कोणत्या डब्यात(BOUGI) आरक्षण मिळालेले आहे त्या डब्याचे नाव. जसे H1,H2....; A1,A2.....; B1,B2....; G1,G2....; S1,S2.....; D1,D2.......; इ.त्या नंतर त्या डब्यात मिळालेली शायिका किंवा आसनचा क्र.उदाः
H1 6 = प्रथम वर्ग वातानुलीत च्या एच १ डब्यात सहा क्र, ची शायिका.
A 2 12 = द्वितीय वर्ग वातानुकुलीत च्या ए २ डब्यात बारा क्र. ची शायिका.
B 1 17 = 3 टियर वातानुकुलीत च्या बी-१ डब्यात १७ क्र. ची शायिका.
S 6 61 = द्वितीय श्रेणी शयनयान च्या एस-६ डब्यात ६१ क्र. ची शायिका.
अश्या प्रकारे प्रत्येक गाडीला ज्या वर्गाचे डबे असतील त्या वर्गा प्रमाणे तुम्ही घेतलेल्या टिकिटावर नमूद केलेले असते.
जर तुमचे नाव प्रतिक्षा यादी मध्ये असेल तर तुमच्या टिकिटावर खालील प्रमाणे नमूद केलेले असेल
RAC 5 / CNF किंवा
RAC 19 / RAC 6 किंवा
W/L 4 / RAC 2 किंवा
W/L 30 / W/L 5
प्रवासी पुरुष असल्यास M व त्याचे वय
महिला असल्यास F व तिचे वय
* प्रवाश्याचे नाव लिहिलेले नसते.
उदा: आरक्षण फार्म भरताना खालील प्रमाणे नावे लिहिली असल्यास
प्रमोद कर्णिक M 45
रीना कर्णिक F 40
नेहा कर्णिक F 11
वसंत कर्णिक M 7
पक्के आरक्षण असल्यास टिकिटावर पुढील प्रमाणे नमूद केलेले असेल:
S 5 57 M 45
S 5 58 F 40
S 5 59 F 11
S 5 60 M 7
तुमचे नाव प्रतीक्षा यादीत असल्यास :
W / L 112 W / L 80
W / L 113 W / L 81
W / L 114 W / L 81
W / L 115 W / L 82
6. टिकिटाचे भाडे अंका मधे व शब्दा मधे दर्शविले असते उदाः
Rs 355
THREE FIVE FIVE
7. टिकिटावर खाली डाव्या कोपऱ्यावर गाडीचे नाव जसे पुणे नागपूर एक्सप्रेस व त्या पुढे प्रवासी ज्या
स्टेशनहून गाडीत बसणार आहे त्या स्टेशनचे नाव नमूद केलेले असते व त्या पुढे प्रवास सुरु करण्याची तारीख, गाडी सुटण्याची वेळ , प्रवास संपण्याची तारीख व गंतव्य स्टेशन ला गाडी पोहोचण्याची ची वेळ
8 सर्वात खाली जी ओळ असते ती पुढील प्रमाणे:
रेंडम नंबर* जो तीन अंकी असतो , ज्या तारखेला टिकिट बुक केले आहे ती (प्रवासाची नाही) तारीख, ज्या वेळेवर टिकिट बुक झाले आहे ती वेळ, ज्या आरक्षण केंद्रातून टिकिट बुक केले त्या केंद्राचे नाव, ज्या खिडकी वर टिकिट बुक झाले त्या खिडकीचा क्रमांक, गाडी ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गाचा थोडक्यात तपशील दिलेला असतो.
( *रेंडम नंबर हा फक्त भारतीय रेल्वे च्या वापराकरिताच आहे)