PRAVASI

सोमवार, 5 अप्रैल 2010

 
कमीत–कमी सामानासह प्रवास करा  
शयनयान वर्ग आणि दुसऱ्या वर्गातील प्रवाश्यांच्या अखत्यारीतील सामान 
                                                       
(अ)      डब्यातील जागा अनावश्यक रित्या अडवली जाऊन इतर प्रवांशांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने प्रवाशांनी आपल्या सोबत अत्यावश्यक, सहज वाहून नेता येण्याजोगे आणि सुटसुटीत सामान घ्यावे जेणेकरून प्रवासात त्यांना ते उपयोगी ठरेल त्याचबरोबर इतरांना अडचणीचे न ठरता डब्यांत व्यवस्थित ठेवता येईल.   
(ब) वातानुकूलित खुर्चीयान किंवा अन्य खुर्चीयान इ. डब्यातून अवजड आणि भारी वजनाच्या सामानवाहतुकीस परवानगी नाही. अशाप्रकारचे सामान गाडीच्या गार्डच्या ताब्यातील ब्रेक-व्हॅनमधून बुक केले पाहिजे. अतिअवजड वस्तू उदाः ट्रंक,पेटी,वळकटी इत्यादिंमुळे मोकळेपणे हालचाल करण्यास अडसर बनून प्रवाशांची गैरसोय होण्यास कारणीभूत ठरतात.पुढे दिलेल्या आकारमानाची मर्यादा न ओलांड़नाऱ्या सुटकेस-बॅगा इ. छोट्या वस्तू आपल्यासोबत घेण्यास प्रवाशांना परवांनगी देण्यात आलेली आहे.
आकारमान : ६३सें.मी.X३७सें.मी.X२०सें.मी.(२०X२०X)
(क) (१) प्रतीप्रवासी एक संगीत वाद्य व्यक्तिगत सामान म्हणून सोबत घेण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. या सामानावर प्रत्यक्ष वजनाप्रमाणे दर आकारला जाईल आणि त्यावर कमाल भार-वहन माफीची सूट मिळेल. तरीसुद्धा प्रवाशासमावेत एकापेक्षा जास्त वाद्ये असतील तर भा.रे.संमेलन संघटना कोचिंग दरपत्रक क्र.२५ भाग-१ अंक-१ मधील नियम ५०५(३)अन्वये प्रवाशास आकार भरावा लागेल.
   (२) उचलून घेऊन जाण्यायोग्य एक दूरदर्शन संच प्रती-प्रवासी व्यक्तिगत सामान म्हणून वहन करण्यास प्रवाशास परवानगी देण्यात आली आहे  आणि वजन किंवा आकारमान यानुसार जास्त असलेला आकार-त्यावर कमाल भारवाहन माफी ची सूट वजा जाता भरावा लागेल. तरीही असे एकापेक्षा जास्त दूरदर्शन संच व्यक्तिगत सामान म्हणून प्रवासी आपल्या सोबत नेत असल्यास किमान भार-वाहन माफीची सूट मिळणार नाही.

(३) छोट्या मुलांची एक तीन-चाकी सायकल प्रती-प्रवासी व्यक्तिगत सामान म्हणून वहन करण्यास प्रवाशास परवानगी देण्यात आली आहे आणि त्यावर कमाल भारवाहन माफी ची सूट देण्यात आली आहे.तरीसुद्धा अशा एका पेक्षा जास्त तीन-चाकी सायकली व्यक्तिगत सामान म्हणून प्रवासी आपल्या सोबत नेत असल्यास भा.रे.संमेलन संघटना कोचिंग दरपत्रक क्र.२५ भाग-१ अंक ३ च्या नियम ५०१ अन्वये दर आकारला जाईल.
(४) आपल्यासोबत फक्त मांडीवर घ्यायचा संगणक(लॅपटॅाप)घेऊन प्रवास करण्यास प्रवाशांस परवानगी देण्यात आली आहे.तसेच पुढे दिलेल्या अटींची पूर्तता होत असल्यास एक व्यक्तिगत संगणक (डेस्कटॅाप/टेबलटॅाप संगणक) आपल्या साधन-सामुग्रीसह बुक करून प्रवासी स्वतःबरोर घेऊ शकतो.     
(अ) डेस्कटॅाप/टेबलटॅाप संगणकचे बुकिंग करतांना त्यावर इतर सामानाचे बुकिंगसोबत मिळणारी भारवाहन सूट मिळणार नाही.
(ब)मॅानिटर आणि सी.पी.यू. स्वतंत्रपणे वहन केला जावा तसेच कि बोर्ड व यु.पी.एस. प्रवाशाने आपल्या बॅगेतून सोबत न्यावा.
(क) व्यक्तिगत संगणकासोबत उचलून घेऊन जाण्यायोग्य दूरदर्शन संच घेउन जाता येणार नाही.
(ड) तोटा/नुकसानसंबंधी कोणताही दावा स्वीकृत होणार नाही.      
(५) सर्वसाधारण व्यापारी म्हणून गणल्या गेलेल्या वस्तू/माल लगेज(सामान)रूपाने.ब्रेक-व्हॅनमधून बुक करता येणार नाही.
(६) जर ट्रंक, सूटकेस आणि बॉक्सेस, ज्यांचे बाह्य आकारमान परिच्छेद(ब)मध्ये दिलेल्या आकारमानापेक्षा अधिक असेल अशा वस्तू प्रवाशी डब्यांतून नव्हे तर ब्रेक-व्हॅनमधूनच बुक करून वहन करणे आवश्यक आहे.
(७) प्रवाशास ब्रेक-व्हॅनमधून लगेज(सामान) चे बुकिंग करावयाचे असल्यास प्रवासी गाड्यांच्या ब्रेक-व्हॅनमधून सामानाचे वहन करतेवेळी बुकिंगसाठी आणल्या जाणाऱ्या सामानाच्या(व्यक्तिगत वा व्यापारी)डागांची संख्या आणि प्रकार यांवर कोणतेही बंधन असणार नाही. तरीसुद्धा किमान भार-वहन माफीच्या सुटीव्यतीरिक्त प्रवाश्याच्या ताब्यातील परवानागीयोग्य सामानापेक्षा जास्त सामानासाठी ‘स्केल-एल’ नुसार असलेल्या दराच्या दीडपट दराने आकार भरावा लागेल. प्रतिव्यक्ती एक व्यक्तिगत मोटारसायकल/दुचाकी स्कुटर/बायसिकल लगेज म्हणून ब्रेक-व्हॅनमधून बुक करण्यास परवानगी दिलेली आहे. पारेषण नोट(Forwarding Note)मध्ये स्कुटर आणि मोटारसायकलची किंमत जाहीर केली पाहिजे.आणि अतिरिक्त किंमतीवर प्रतिशत आकार, रेल्वे जोखीम दराने देय असलेल्या मालभाडे दराच्या आकार व्यतिरिक्त भरला पाहिजे.
सामानासाठी मोफत भत्ता               
(१) खाली दिलेला मोफत भत्ता/ किमान भत्ता यांची डब्यांमधून सामान वहनाची कमाल मर्यादाः
वर्ग
कमाल
मर्यादा
मोफत
भत्ता
किमान
भत्ता
१५ कि.ग्रा
प्रथम वर्ग,२टायर वाता.
१०० कि.ग्रा.
५० कि.ग्रा.
 ३टायर वाता./वाता.खुर्चीयान
 ४० कि.ग्रा.
१० कि.ग्रा.
शयनयान वर्ग
८० कि.ग्रा.
 ४० कि.ग्रा.
१० कि.ग्रा.
द्वितीय वर्ग
७० कि.ग्रा.
३५ कि.ग्रा.
१० कि.ग्रा.
  कमाल मर्यादे मध्ये मोफत भत्ता समाविष्ट आहे.
(२)सामान दराच्या १.५ पटीमध्ये परिच्छेद १ मध्ये उल्लेखील्याप्रमाणे प्रवासाच्या वर्गाप्रमाणे आकार भरून, प्रवाश्यांना डब्यामध्ये मोफत भत्ता मर्यादेपलीकडे कमाल मर्यादेपर्यंत अतिरिक्त सामान बुक करून वहन करण्याची अनुमती देण्यात आलेली आहे.
(३)मार्गामध्ये किंवा गंतव्य स्थानामध्ये,बुक न केलेल्या किंवा अंशतः बुक केलेल्या सामानासहित ज्याचे वजन मोफत भत्यापेक्षा जास्त असेल,प्रवासी आढळल्यास,अतिरिक्त बुक न झालेल्या मोफत भत्यापेक्षा जास्त मर्यादेच्या सामानावर सामानदर प्रमाणाच्या सहापट आकार भरावा लागेल.तरीसुद्धा जर बुक न झालेले अथवा अंशतः बुक झालेले सामान हे सामानाच्या मोफत भत्त्या पेक्षा जास्त परंतु सिमीत भत्त्याच्या मर्यादेत असेल,तर सामान दर प्रमाणाच्या १.५पटीत दर आकारला जाईल.जेंव्हा गाडीच्या गंतव्य स्थानी किंवा मार्गात बुक झालेल्या किंवा अंशतः बुक झालेल्या सामानासह ज्यांचे वजन मोफत भत्त्याच्या मर्यादेपेक्षा परवानगी असलेल्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त आहे, आढळून आला तर त्याला सामान प्रमाणदराच्या सहा पटींमध्ये किंवा कमीत कमी रु ५०/- प्रमाणे आकार भरावा लागेल.
(४) प्रवाश्यांना डब्यामध्ये १०० सें.मी.X६० सें.मी.X२५ सें.मी.(लांबीXरुंदीXउंची)असे बाह्य मोजमाप असलेल्या ट्रंक,सुटकेस आणि बॅाक्सेस स्वतः चे व्यक्तिगत सामान म्हणून वहन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. बाह्य मोजमाप कोणत्याही परिस्थितीत जास्त होत असेल तर ट्रंक,सुटकेस आणि बॅाक्सेस  ब्रेक-व्हॅनमधे बुक करून वहन कराव्या लागतील.प्रवाशांचे व्यक्तिगत सामान म्हणून(प्रवासी डब्यामध्ये) नाही.                          
(५) व्यापाराच्या वस्तू व्यक्तिगत सामान म्हणून बुक करून प्रवासी डब्यात वहन करण्यास परवानगी दिली जाणार नाही. वर दर्शविल्याप्रमाणे किमान भार-वहन सुटीपेक्षा जास्त वजनाचे सामान प्रवासी ब्रेक-व्हॅनमधून नेऊ शकतो. त्या साठी त्याला लगेज तिकीट बनवावे लागेल. पारेषण नोट भरून द्यावी लागेल आणि योग्य पॅकिंग होईल याची खात्री करून घ्यावी लागेल.
(६) वातानुकुलीत आणि पहिला वर्ग या मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत.टिफिन बास्केटसह वॅाकिंग-स्टिक्स व छत्र्या मोफत नेण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.त्यांचा वजनामध्ये समावेश केला जाणार नाही(टिफिन बास्केटमध्ये छोट्या बर्फपेट्या, छोट्या हॅंडबॅग्स किंवा अॅटॅची केसेस(सूटकेसेस नव्हे)यांचा अंतर्भाव आहे. शयनयान कक्ष आणि द्वितीय वर्ग आसनस्थ प्रवासी यांच्या बाबतीत,वॅाकिंग-स्टिक्स, छत्र्या आणि प्रवासातील गरजेप्रमाणे अन्नपदार्थ मोफत नेण्यास परवानगी दिलेली असल्याने त्यांचे वजन केले जाणार नाही.
(७)संयुक्त तिकिटाच्या संदर्भात,किमान भार-वहन सूट हि उच्च वर्गाच्या किमान भार-वहन सूटएवढी असेल.
(८)/(१) बुक न केलेल्या सामानाचे वजन किंवा अंशतः बुक केलेल्या सामानाच्या ज्या  भागासाठी आकार भरण्यात आलेला नाही आसा भाग  जर नियम ५१४(१) मध्ये नमूद किमान भार-वहन सुटीव्यतिरिक्त  नियम ५१५(१) मधील नमूद मर्यादेपेक्षा जास्त भरल्यास किमान भार-वहन सुटीच्या कक्षेबाहेरील वजनावर किमान रु.५० किंवा ‘स्केल आर’ मध्ये निर्देश केलेल्या दाराच्या ६(सहा) पट आकार- जो जास्त असेल, भरावा लागेल
(८)/(२) एखादा प्रवासी रेल्वेमार्गावरील आपल्या प्रवासादरम्यान किंवा गन्तव्य स्थानकावर त्याच्यासोबत असणाऱ्या सामानाचे योग्य बुकिंग दाखवू शकला नसेल वा त्याच्या जवळ बुकिंग केलेल्या सामानापेक्षा जास्त वजन/मापाचे सामान कि जे उपनियम ५१४(५) अन्वये ठरलेल्या जास्तित-जास्त मर्यादेहून अधिक आहे, आढळून आल्यास किमान भार-वहन सुटीच्या कक्षेबाहेरील वजनावर किमान रु ५० किंवा ‘स्केल आर’ मध्ये निर्देश केलेल्या दाराच्या ६(सहा) पट आकार- जो जास्त असेल, भरावा लागेल
(८)/(३) एकमार्गीय टिकट धारक जर बुक न केलेल्या किंवा अंशतः बुक केलेल्या किमान भार-वहन सुटीपेक्षा जास्त सामानासह परंतु सरासरी सुटीच्या मर्यादेत असलेल्या वजनाच्या सामानासहित सापडल्यास त्याला सामानामध्ये किमान भार-वहन सुटीपेक्षा असलेल्या जास्त वजनासाठी ‘स्केल-आर’, ‘स्केल-पी’, आणि ‘स्केल-एस’ दराने जो दर लागू असेल त्याच्या सहापटीत किंवा कमीत कमी रु ३० आकार भरावा लागेल.
(९) बुक न केलेल्या सामानावर दंड भरण्याचे टाळण्यासाठी प्रवाशांना आपला प्रवास सुरु करण्यापूर्वीच आपल्याजवळील अतिरिक्त सामानाचे योग्य बुकिंग करावे अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे.                         
पाळीव कुत्र्यांना घेऊन जाणे



                                                                      
                                          
जर आपण दोन किंवा चार शायिकांचा डबा संपूर्णतः आपल्याच उपयोगासाठी, ६० कि.ग्रा. ला लागू असल्याप्रमाणे स्केल-आर(राजधानी पार्सल सेवा),स्केल-पी(प्रीमियर पार्सल सेवा), स्केल-एस(स्टॅण्डर्ड पार्सल सेवा)दर भरून, आरक्षित करणार असाल तर आपल्याबारोर प्रथम वर्ग वातानुकुलित किंवा प्रथम वर्गाच्या डब्यात पाळीव कुत्रा नेऊ शकता.
इतर वर्गाच्या डब्यामधे आपल्याबारोर पाळीव कुत्रा नेण्यास परवानगी नाही. ३०कि.ग्रा. वजनास लागू असल्याप्रमाणेच पाळीव कुत्रा बुक करून एस.एल.आर. किंवा ब्रेक-व्हेनमधूनच नेता येईल. काही गाड्यांमधून विशेष करून कुत्र्यासाठी तयार केलेल्या पेट्या (डॅाग्ज-बॉक्स) उपलब्ध आहेत.
प्रती पाळीव कुत्रा कमीत कमी सामान दर रु. ३० आहे. प्रवाशांना सूचना आहे कि पाळीव  कुत्रा  बुक  करण्यासाठी  कृपया  करून  सामान  घर(पार्सल ऑफिस) मध्ये संपर्क करावा. बुक न केलेला पाळीव कुत्रा प्रवासात जवळ आढळल्यास.त्या प्रवाशांस कमीत-कमी रु ५० किंवा जसे लागू असेल त्याप्रमाणे स्केल-आर(राजधानी पार्सल सेवा),स्केल-पी(प्रीमियर पार्सल सेवा), स्केल-एस(स्टॅण्डर्ड पार्सल सेवा) च्या सहापटींमध्ये भरावे लागेल.         


टिप्पणियाँ: एक टिप्पणी भेजें

सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]





<< मुख्यपृष्ठ

मेमोरी

मार्च 2010   अप्रैल 2010   सितंबर 2010  

This page is powered by Blogger. Isn't yours?

सदस्यता लें संदेश [Atom]